Kishore Kumar Hits

Myuzic Pandits - Aarti Saprem lyrics

Artist: Myuzic Pandits

album: Gajanana Sri Ganraya, Vol. 1


आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
भक्तसंकटीं नाना (ॐ)
भक्तसंकटीं नानास्वरूपी स्थापिसी स्वधर्म
स्वरूपी स्थापिसी स्वधर्म
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
अंबऋषीकारणे गर्भवास सोशीसी
वेद नेले चोरुनी ब्रह्मया आणुनियां देसी
मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी
हस्त तुझा लागता (ॐ)
हस्त तुझा लागता शंखासुर वर देसी
शंखासुर वर देसी
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
रसातळासी जाता पृथ्वी पाठीवर घेसी
परोपकारासाठी देवा कासव झालासी
दाढे धरुनी पृथ्वी नेता वराहरुपी होंसी
प्रल्हादाकारणे (ॐ)
प्रल्हादाकारणे नरहरि स्तंभी गुरगुरसी
नरहरि स्तंभी गुरगुरसी
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
पाँचवें अवतारी बळीच्या द्वाराला जासी
भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी
सर्व समर्पण केले म्हणुनी प्रसन्न त्या होंसी
वामनरूप धरुनी (ॐ)
वामनरूप धरुनी बळीच्या द्वारी तिष्ठसी
बळीच्या द्वारी तिष्ठसी
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला
कष्टी रे रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला
सहावा अवतार (ॐ)
सहावा अवतार परशुराम प्रकटला
परशुराम प्रकटला
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
मातला रावण सर्वा उपद्रव केला
३३ कोटी देव बंदी हरिलें सीतेला
पितृवचनासाठी रामें वनवास केला
मिळवुनी वानरसेना (ॐ)
मिळवुनी वानरसेना राजा राम प्रकटला
राजा राम प्रकटला
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)
(आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists