Arun Paudwal - Hasnar Kadhi Bolnar Kadhi lyrics
Artist:
Arun Paudwal
album: Majh Ghar Majha Sansar (Original Motion Picture Soundtrack)
ए, हसणार कधी? hmm
बोलणार कधी? (वाट बघ)
ए, हसणार कधी?
बोलणार कधी?
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी?
हसणार नाही (अरे बापरे!)
बोलणार नाही (बोंबला)
हसणार नाही
मी बोलणार नाही
माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही
ए, हसणार कधी? (हसणार नाही)
नाकावरचा राग तुझ्या जाणार (नाही)
♪
मोठ्या-मोठ्या बाता, बढाया
मारल्या कोणी? कोणी? कोणी?
"बघूया गं, करूया की नाही"
म्हटलंय कोणी? कोणी? कोणी?
मोठ्या-मोठ्या बाता, बढाया
मारल्या कोणी?
"बघूया गं, करूया की नाही"
म्हटलंय कोणी?
बोलाचाच भात, बोलाचीच कढी
बोलाचाच भात नि बोलाचीच कढी
ज्या त्या गोष्टीत पाहूया, करूया
करूया, पाहूया, हा
ए, हसणार कधी? (हसणार नाही)
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी?
♪
गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण? कोण? कोण?
जाणुन-बुजूण भोंदू-बगळा बनलंय कोण? कोण? कोण?
अगं, गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलंय कोण?
जाणुन-बुजूण भोंदू-बगळा बनलंय कोण?
लग्नाची घाई मला बुवा नाही (अच्छा)
लग्नाची घाई मला बुवा नाही
होईल तेव्हा होऊं द्या
केव्हाही-कधीही, केव्हाही-कधीही (आ, आई-आई)
हसणार कधी?
बोलणार कधी?
नाकावरचा राग तुझ्या जाणार कधी?
हसणार नाही
मी बोलणार नाही
माझ्यापाशी लाडीगोडी चालणार नाही
ए, हसणार कधी? (हसणार नाही)
नाकावरचा राग तुझ्या जाणार (नाही)
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist