रित्या, साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या रित्या, साऱ्या दिशा वाटा आता कोसळल्या बरसते रात आत-आत खोल मुक्याने एकटे हरवली साथ मोडलेला खेळ कुणी ना सोबती ♪ Hmm, आता थकलेल्या जीवा मिळू दे आसरा साऱ्या दुखऱ्या या तणांचा विझवू दे दिवा घेऊ दे ना उशाशी चंद्र अन चांदण्या अंथरुण शांतता मिटू दे ना पुन्हा आता पुन्हा-पुन्हा, आता पुन्हा अंधार हा पांघरला रित्या, साऱ्या दिशा डोळ्यात या काजळल्या बरसते रात आत-आत खोल मुक्याने एकटे हरवली साथ मोडलेला खेळ कुणी ना सोबती