आस तू भास तू ताल तू खुलल्या श्वासांचा पडसाद ओठी श्वासांचे श्वासात मौनाचे मौनात खुलती आज नवे हे अर्थ स्वप्नांचे अंतरी बेभान चांदण्याची रात का सांगते भिजलेल्या पापण्यांचे गुज का काहूर उठते मनी का रंग गालास का हो चिंब अंगावरी का शहारा जीव होई जणू काजवा पडसाद स्पर्शात मौनाचे मौनात स्वप्नाचे श्वासात रुजती अर्थ नवे हळुवार ओठांचे आस तू भास तू ताल तू खुललेल्या स्वपनांची रात तू प्रीत तू अर्थ तू मिटल्या ओठांचा