किती दिस जाहले, तुला पाहिले न मी तरी भास का तुझा होई मजला? किती दिस जाहले, तुला ऐकले ना मी तरी साद का ही तुझी येई मजला? स्वप्न तुझ्या सोबतीच होत पाहिलं अर्थ अशा जगण्याला नाही राहिलं संपवावे आता सारं काही गं तरी का विचार तुझा हा जाईना? दिस जगण्याचे होई गं कमी तरी तुझं प्रेम कमी का होई ना? दिस जगण्याचे होई गं कमी तरी तुझं प्रेम कमी का होई ना? तुझ्याविना दुजा दिसला कुणीच ना तुझी याद काही केल्या झाली गं कमीच ना जग सारे सोबतीला तरी तुझी आस गं काही केल्या जात नाही, तुझा होतो भास गं सारं माझं आयुष्य मी तुला वाहिलं तूच नाही सोबतीला काय राहिलं? संपवावे आता सारं काही गं तरी का विचार तुझा हा जाईना दिस जगण्याचे होई गं कमी तरी तुझं प्रेम कमी का होई ना? दिस जगण्याचे होई गं कमी तरी तुझं प्रेम कमी का होई ना? ♪ तुझे नाव घेता मन होई बावरे पुन्हा ताजे होई माझे जुने सारे घाव रे तूच सांग कोणासाठी जगावे मी आज गं? तुझ्याविना जगण्याला उरला ना साज गं विचारात भेट दे तू मला कैकदा प्राण जाण्याआधी तू गं, ये ना एकदा तूच नाही आता सोबतीला रं याद येते तूझी झोप येईना दिस जगण्याचे होई गं कमी तरी तुझं प्रेम कमी का होई ना? दिस जगण्याचे होई गं कमी तरी तुझं प्रेम कमी का होई ना?