रिमझिमझिम पाऊसधारा रोमरोम फुलवी गं
झुल, झुल, झूल आतुर झोका हृदयातून झुलवी गं
रिमझिमझिम पाऊसधारा रोमरोम फुलवी गं
झुल, झुल, झूल आतुर झोका हृदयातून झुलवी गं
चुकचुकला ठोका नभाचा, गहिवरला घन हा प्रीतीचा
कधी थेंब फुलांच्या संगे, ही लाज अबोली रंगे
कुणी येईल का भेटाया वाऱ्याच्या मंजुळ वेगे
चुकचुकला ठोका नभाचा, गहिवरला घन हा प्रीतीचा
♪
शहारले, थरारले तरुपणाचे लेणे
हृदयाचे हृदयाशी व्हावे देणे-घेणे
शहारले, थरारले तरुपणाचे लेणे
हृदयाचे हृदयाशी व्हावे देणे-घेणे
पानात फुल जपते मी अन स्वतःशीच हसते मी
वळून पुन्हा बघतांना बघ कशी मना फसते मी
रंग-रंग हे फुलपंखांचे ऋतुबंधीत उखाणे
रिमझिमझिम पाऊसधारा रोमरोम फुलवी गं
झुल, झुल, झूल आतुर झोका हृदयातून झुलवी गं
चुकचुकला ठोका नभाचा, गहिवरला घन हा प्रीतीचा
♪
खुणावते, पुकारते हळवे नवथर गाणे
तरंगते नभात मी कुठल्याश्या गोड सुखाने
खुणावते, पुकारते हळवे नवथर गाणे
तरंगते नभात मी कुठल्याश्या गोड सुखाने
का चिंब-चिंब भिजते मी, स्वप्नात नव्या सजते मी
श्रीरंग मेघ मल्हारी वाऱ्यातून भिरभिरते मी
मंद-मंद हा अंकुर उमले गहिऱ्या नवरंगाने
रिमझिमझिम पाऊसधारा रोमरोम फुलवी गं
झुल, झुल, झूल आतुर झोका हृदयातून झुलवी गं
चुकचुकला ठोका नभाचा, गहिवरला घन हा प्रीतीचा
कधी थेंब फुलांच्या संगे, ही लाज अबोली रंगे
कुणी येईल का भेटाया वाऱ्याच्या मंजुळ वेगे
चुकचुकला ठोका नभाचा, गहिवरला घन हा प्रीतीचा
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist