एकतारी गाते गुरुनाम, समर्था
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
नादावली गुरुपायी...
नादावली गुरुपायी, आसावली भेटीसाठी
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
♪
चित्त ओढ घेई स्वामी समर्था रे
चित्त ओढ घेई स्वामी समर्था रे
दर्शन केधवा स्वामी, देणार मला रे?
दर्शन केधवा स्वामी, देणार मला रे?
वेड लागे, सूर जागे...
वेड लागे, सूर जागे माझ्या गुरुसाठी
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
♪
मठातुनी गुरुवारी नित्य जप ध्यान
पदर पसरूनी मी धरिते चरण
मठातुनी गुरुवारी नित्य जप ध्यान
पदर पसरूनी मी धरिते चरण
नाम घेते, आडविते...
नाम घेते, आडविते जप तुझ्या ओठी
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
♪
अक्कलकोटी हो तुमचा निवास
अक्कलकोटी हो तुमचा निवास
दाही दिशातुनी वाहे कृपेचा सुवास
दाही दिशातुनी वाहे कृपेचा सुवास
प्रगटावे योगीराज...
प्रगटावे योगीराज आज भक्तासाठी
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
नादावली गुरुपायी...
नादावली गुरुपायी, आसावली भेटीसाठी
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
एकतारी गाते गुरुनाम, समर्था
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist