Kishore Kumar Hits

Ajeet Kumar Kadkade - Uge Atthavis Ubha lyrics

Artist: Ajeet Kumar Kadkade

album: Shri Swami Samrthanchya Aartiyan


युगे २८ विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गां
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)
तुळशीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे, पितांबर कस्तुरी ललाटी
देव सुरवर नित येती भेटी
गरुड हनुमंत पुढे उभे राहती
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे, वनमाळा गळा
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळीती राजा विठोबा सावळा
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)
ओवाळू आरत्या, कुरवंड्या येती
चंद्रभागेमध्ये नेवूनिया देती
दिंड्या, पताका वैष्णव नाचती
पंढरीचा महिमा वर्णावा किती
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चंद्रभागे माजी स्नाने जे करिती
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती
केशवासी नामदेव भावे ओवाळीती
जय देव, जय देव...
(जय देव, जय देव, जय पांडुरंगा)
(रखुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा)
(जय देव, जय देव...)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists