Kishore Kumar Hits

Vaishali Samant - Mi Lagalo Bolayala lyrics

Artist: Vaishali Samant

album: Hi Sanj Sukhane


मी लागलो बोलायला
तू बोल वा बोलू नको
हाती तुझ्या हा फैसला
तू बोल वा बोलू नको
मी जाणतो आहे तुझ्या
डोळ्यातल्या हिरव्या खुणा
पण शब्द दे ओठातला
तू बोल वा बोलू नको
विसरून तू जाशीलही
माझे ऋतू माझे बहर
होतोच मी कोठे भला
तू बोल वा बोलू नको
बोलेन मी रंगातुनी
ह्र्दयातली भाषा तुझी
आहे तुझा मी कुंचला
तू बोल वा बोलू नको

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists