चांदण पडलंय जसं रूपानं तुझ्या गं सजलंय ना डोळ्यात माझ्या दिसं व्हटात नाव तुझं भरलंय ना चांदणी जशी खुललिया गालावर खळी पडलिया रंगलंया आज सारं, नव्यानं उजाळलं सैरावैरा मन हे गं पळतंय तुझं देखणं रूप याड लावतंय सैरावैरा मन हे गं पळतंय तुझं देखणं रूप याड लावतंय सैरावैरा मन हे गं पळतंय तुझं देखणं रूप याड लावतंय (लावतंय, लावतंय) ♪ (सैरावैरा) ♪ तुझ्यावर जीव भुलला असा सांग माझी राणी तू होशील का? हात तुझा हाती या देऊन गं सात जन्मांची साथ देशील का? नजरेनं सारं हेरलंय काळजात काही रुतलंय हसून तू हळूचं गं मनात घर केलंय रंगलंया आज सारं, नव्यानं उजाळलं सैरावैरा मन हे गं पळतंय तुझं देखणं रूप याड लावतंय हे सैरावैरा मन हे गं पळतंय तुझं देखणं रूप याड लावतंय सैरावैरा मन हे गं पळतंय तुझं देखणं रूप याड लावतंय ♪ तुझ्या मागं-मागं मी ही आले रं तुझ्याशी रं मी ही नातं जोडलंया सांग कधी बांधणार डोरलं रं? तुझ्यासंग प्रीत माझी जुळलिया प्रेम तुझं मला कळतंय सुख मला सारं भेटलंय तुझीच मी झाली ही रं माझं ही भान गेलंय रंगलंया आज सारं, नव्यानं उजाळलं सैरावैरा मन हे रं पळतंय माझं देखणं रूप याड लावतंय सैरावैरा मन हे गं पळतंय माझं देखणं रूप याड लावतंय सैरावैरा मन हे रं पळतंय माझं देखणं रूप याड लावतंय