सांग तू सखये, मजला सांग तू सखये, मजला जखमा दिलेल्या अजुनी न विरल्या सल तो मनाचा अजुनी न सरला सजवुनी जीवन का केली निराशा? सांग तू सखये, मजला सांग तू सखये, मजला ♪ हो, रूजली आशा त्या सांजवेळी सागरलाटांची साथ ओली सारीपाट शपथांचा तो नटला अधरांची भाषा रंगून गेली स्वप्नफुलाला या काटे का रूतले गं? रिमझिमत्या मेघांचे का थेंब विरले गं? विझल्या ज्वाळा, बुझल्या वाटा कुठवर साहू हा वादळवारा सांग तू सखये, मजला सांग तू सखये, मजला ♪ बदलून गेली सारी दुनिया स्वप्न उरीचे गेले विलया बेसूर झाले जीवनगाणे भेदून गेला तीर ह्रदया परतून स्वप्नांना आकार देशील का? छेडून सूरगीत प्रीतीचे गाशील का? विसरून सारे बिलगून मजला जीवनी रंग नवे भरशील का? सांग तू सखये, मजला सांग तू सखये, मजला जखमा दिलेल्या अजुनी न विरल्या सल तो मनाचा अजुनी न सरला सजवुनी जीवन का केली निराशा? सांग तू सखये, मजला सांग तू सखये, मजला