"ॐ नमो" हा सूर जिथे रंगतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो "ॐ नमो" हा सूर जिथे रंगतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो ♪ या सुराची महान शक्ती नित्य आळवी भक्ती-मुक्ती या सुराची महान शक्ती नित्य आळवी भक्ती-मुक्ती या सुराचा आश्रय घेता भाव जिथे डोलतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो ♪ चराचरातुनी व्यापुनी उरला सूर मनोहर जगा वेगळा चराचरातुनी व्यापुनी उरला सूर मनोहर जगा वेगळा भक्ती रसातून भक्तजनांना सौख्य जिथे अर्पितो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो ♪ नित्य पहाटे प्रसन्न वदने सूर जपावा शुद्ध मनाने नित्य पहाटे प्रसन्न वदने सूर जपावा शुद्ध मनाने जपता-जपता भान हरपुनी हर्ष जिथे दंगतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो "ॐ नमो" हा सूर जिथे रंगतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो श्रीहरी नित्य तिथे नांदतो