डोईवरी पाण्याचा गं माठ मी हळूहळू चढता यमुना घाट कशी पडली अचानक गाठ गोकुळातला चोर आला नंदाचा पोर झाला आडवा कुणी मला सोडवा कुणी मला सोडवा, सोडवा, सोडवा त्यानं माझी रोखीली गं वाट हा, खडा मारला अन फोडीला की माठ उभं राहून हा तेवर धीट, हा तेवर धीट खट्याळ हा श्रीरंग, बाई भिजविले अंग झोंबे गारवा कुणी मला सोडवा कुणी मला सोडवा, सोडवा, सोडवा ♪ काय म्हणू मी याच्या खोडीला? काय म्हणू मी याच्या खोडीला? ओला पदर की माझा ओढीला ओला पदर की माझा ओढीला चंद्रहार गळ्यातला तोडला तोडला, बाई तोडला (कुणीतरी धावा) कुणी ऐका माझी हाक, बाई झाला थोडा धाक वेड्या माधवा कुणी मला सोडवा कुणी मला सोडवा, सोडवा, सोडवा कुणी नाही तिथं चिट-पाखरू माझी मला मी कशी सावरू, कशी सावरू सूर मुरलीचे झाले सुरू सूर मुरलीचे झाले सुरू पुढे पडे ना पाय, बाई आता करू काय मोहे गोडवा कुणी मला सोडवा कुणी मला सोडवा, सोडवा, सोडवा