झळही नसे मज तापल्या उन्हाची
घरकुल सावरी सावली कुणाची
म्हणे तुका, नामा, जनाई
म्हणे तुका, नामा, जनाई, जनाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
♪
वाट-घाट अनवाणी सुखात सरली
कळ देई खळी माझ्या मुखात माऊली
कळ देई खळी माझ्या मुखात माऊली
सभा पंढरीची, राया, पंढरीची, राया
सभा पंढरीची, राया, ऊरात भरली
जीणं झालं सोनं काही आस ना उरली
रान-पान मारी बढाई
रान-पान मारी बढाई, बढाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
♪
माळ तुळशीची, टिळा चंदनाचा भाळी
क्षिणला हा देह जरी थकली ना टाळी
क्षिणला हा देह जरी थकली ना टाळी
सोडवून सारी, सोडवून सारी, सारी
सोडवून सारी अंधाराची जाळी
दिस नवा येई तुझी ऐकण्या भूपाळी
आभाळाला देई निळाई
आभाळाला देई निळाई, निळाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
ठायी-ठायी माझी विठाई, विठाई
ठायी-ठायी माझी विठाई
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist