कुठे पाठ फिरवून गेला निवारा? हरवून गेल्या कुठे जाणिवा? किती कान देऊन अंधार ऐकू? शोधू कुठे बोलणारा दिवा? कुठे पाठ फिरवून गेला निवारा? हरवून गेल्या कुठे जाणिवा? कसा काय पाहू आता आरसा मी? शोधू कुठे मोगऱ्याचा सडा? कसा काय पाहू आता आरसा मी? शोधू कुठे मोगऱ्याचा सडा? किती त्या क्षणाचे कसे पांग फेडू? कसे सोडवू गुंतलेल्या जीवा? ♪ कशी फाटक्या ओंजळी या टिपू मी? शोधू कसा ओळखीचा लळा? कशी फाटक्या ओंजळी या टिपू मी? शोधू कसा ओळखीचा लळा? कितीदा धरू स्पर्श शून्यात काही? उदासीन झाला असा चांदवा कुठे पाठ फिरवून गेला निवारा? हरवून गेल्या कुठे जाणिवा? किती कान देऊन अंधार ऐकू? शोधू कुठे बोलणारा दिवा? कुठे पाठ फिरवून गेला निवारा? हरवून गेल्या कुठे जाणिवा?