दूर कुठे चंदनाचे बन जळते, दूर...
दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते गं, मला कळते
तुला कळते गं, मला कळते, दूर...
दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते गं, मला कळते
तुला कळते गं, मला कळते, दूर...
♪
जाळ धावूनिया येता होरपळे अंग
जाळ धावूनिया येता होरपळे अंग
शीतलशा सुगंधाने निवे अंतरंग
सुखावते कधी...
सुखावते कधी, कधी तळमळते, दूर...
दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते गं, मला कळते
तुला कळते गं, मला कळते, दूर...
♪
दैवदत्त शाप आहे चंदनाच्या बना
दैवदत्त शाप आहे चंदनाच्या बना
जळल्यावाचून त्याचा उभा जन्म सुना
दुःख भोग भोगताना...
दुःख भोग भोगताना मुक्ती मिळते, दूर...
दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते गं, मला कळते
तुला कळते गं, मला कळते, दूर...
♪
तुला-मला, तुला-मला चंदनाचा जन्म लाभला
तुला-मला, तुला-मला चंदनाचा जन्म लाभला
अशा चंदन पणाला जीव लोभला
उगाळता, जळताही...
उगाळता, जळताही दरवळते, दूर...
दूर कुठे चंदनाचे बन जळते
तुला कळते गं, मला कळते
तुला कळते गं, मला कळते, दूर, दूर, दूर...
Поcмотреть все песни артиста