Kishore Kumar Hits

Milind Ingle - Saanj Gaarva lyrics

Artist: Milind Ingle

album: Saanj Gaarva


संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
माणसांमध्ये असूनसुद्धा मी अगदी एकटा असतो
अळवावरचा थेंब जसा त्यावर बसून वेगळा असतो
मला व्याकूळलेला पाहून सूर्य क्षणभर रेगांळतो
इंद्रधनू होतो आणि सात रंगांत ओघळतो
आभाळ झुकतं पश्चिमेला आणि थोडी कुंद हवा
वाऱ्यावरती लहरत येतो तुझ्या आठवणींचा थवा
एकाएकी दरवळ उठतो रातराणी येते फुलून
तू आता येतेस याची मला पटते खूण
पैंजणांची छमछम आणि कानामागे तुझे श्वास
चोहीकडे भरुन राहतात घमघमणारे तुझे भास
खरंच, संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं
तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
अश्या धुंद वेळी तुझा हात माझ्या हाती हवा
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
उतरून येई आभाळ खाली
किरणे जराशी सोन्यात न्हाली
उतरून येई आभाळ खाली
किरणे जराशी सोन्यात न्हाली
तुझे भास होती चारी दिशांना माझ्या जीवा
झाली जराशी दिवे लागणी
झाली जराशी दिवे लागणी
मौनात कोणी गाईल गाणी
झाली जराशी दिवे लागणी
मौनात कोणी गाईल गाणी
उमलून आता मेघात ये चांदण्यांचा दिवा
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा
अश्या धुंद वेळी तुझा हात माझ्या हाती हवा
हा असा सांज गारवा
वाटे मनाला हवा हवा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists