Kishore Kumar Hits

Milind Ingle - Gaarva lyrics

Artist: Milind Ingle

album: Marathi Monsoon Special


ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं
भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं
तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही
घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो
उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड मुलासारखा सैरावैरा पळत राहतो
पाना, फुला, झाडांवरती, छपरावरती चढून पाहतो
दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ
उन्हामागून चालत येते गार-गार कातर वेळ
चक्क डोळ्यांसमोर ऋतु कूस बदलून घेतो
पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो?

गारवा, hmm, गारवा
वाऱ्यावर भिर, भिर, भिर पारवा नवा-नवा
प्रिये, नभात ही (नभात ही) चांदवा नवा-नवा गारवा

गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे, हिरव्या नदीचे
हिरवे किनारे, हिरव्या नदीचे
पाण्यावर सर, सर, सर काजवा नवा-नवा
प्रिये, मनातही (मनातही) ताजवा, नवा-नवा गारवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर, थर, थर नाचवा नवा-नवा
प्रिये, तुझा जसा (तुझा जसा) गोडवा, नवा-नवा गारवा
वाऱ्यावर भिर, भिर, भिर पारवा नवा-नवा
प्रिये, नभात ही (नभात ही) चांदवा
नवा-नवा गारवा, गारवा

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists