मोगरा अन् गंध त्याचा...
मोगरा अन् गंध त्याचा आवडे पण टाळते मी
मोगरा अन् गंध त्याचा आवडे पण टाळते मी
अन् गुलाबाच्या फुलाचे...
अन् गुलाबाच्या फुलाचे फक्त काटे माळते मी
मोगरा अन् गंध त्याचा, मोगरा
♪
बारमाही संकटांना...
बारमाही संकटांना पावले सरसावलेली
बारमाही संकटांना पावले सरसावलेली
मग कशाला एवढ्याशा...
मग कशाला एवढ्याशा हिरवळे कुरवाळते मी?
मोगरा अन् गंध त्याचा, मोगरा
♪
वेदनेचा भाव नाही चेहऱ्यावरती जरासा
वेदनेचा भाव नाही चेहऱ्यावरती जरासा
काळजीच्या कापूराने...
काळजीच्या कापूराने काळजाला जाळते मी
मोगरा अन् गंध त्याचा, मोगरा
♪
मीच मजला प्रश्न केला...
मीच मजला प्रश्न केला...
मीच मजला प्रश्न केला गतस्पृतींना आठवुनी
सांगवीना रात्रभर का...
सांगवीना रात्रभर का व्यर्थ अश्रू ढाळते मी?
मोगरा अन् गंध त्याचा...
मोगरा अन् गंध त्याचा आवडे पण टाळते मी
अन् गुलाबाच्या फुलाचे...
अन् गुलाबाच्या फुलाचे फक्त काटे माळते मी
मोगरा अन् गंध त्याचा, मोगरा
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist