पाऊस पडून गेल्यावर मन पागुळ्यांगत झाले पाऊस पडून गेल्यावर मन पागुळ्यांगत झाले क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले थेंबाना सावरलेल्या त्या गवताच्या काडांचा पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे, गारांचे आईस चकवूनी आल्या त्या डबक्यातील पोरांचे मोडून मनाची दारे ही ओली पाऊल भरती पाऊस पडून गेल्यावर ह्या ओल्या रस्त्यांवरती पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला विझवून चांदण्या साऱ्या विझलेला, शांत निजलेला ♪ पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा गारवा, hmm, गारवा वाऱ्यावर भिर, भिर, भिर पारवा नवा-नवा प्रिये, नभात ही (नभात ही) चांदवा नवा-नवा गारवा ♪ गवतात गाणे झुलते कधीचे गवतात गाणे झुलते कधीचे गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे, हिरव्या नदीचे हिरवे किनारे, हिरव्या नदीचे पाण्यावर सर, सर, सर काजवा नवा-नवा प्रिये, मनातही (मनातही) ताजवा, नवा-नवा गारवा ♪ आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे ♪ आकाश सारे माळून तारे आता रुपेरी झालेत वारे अंगभर थर, थर, थर नाचवा नवा-नवा प्रिये, तुझा जसा (तुझा जसा) गोडवा, नवा-नवा गारवा वाऱ्यावर भिर, भिर, भिर पारवा नवा-नवा प्रिये, नभात ही (नभात ही) चांदवा, नवा-नवा गारवा, गारवा