साजिरी-गोजिरी दिलरुबा तू भासते चांदणी प्रेयसी तू साजिरी-गोजिरी दिलरुबा तू भासते चांदणी प्रेयसी तू अप्सरा तू इंद्रधनूची कस्तुरी तू माझ्या मनाची तू श्वास माझ्या जीवाचा गुंतला जीव हा, दिलरुबा साजिरी-गोजिरी दिलरुबा तू भासते चांदणी प्रेयसी तू बिल्लोरी ही सालं मंधी लागे ना मोरपिसाचं तुझं मला रे आंधणं ♪ काळजातली तार ती अशी छेडूनी मला गेली ती जशी गंध हा जुना लेवूनी पुन्हा तू उधाणली पावसापरी तूच चाहुली, उन्हात सावली आस तुझी नादावली (आस तुझी नादावली) सांज रंगली तुझ्याचं पावली वाट तुझी रे मखमली चांदणं चुरा झाला वरी तू जसा पुनवेचा चांद गं जीव हा आता खुळा-बावरा तूच माझी गं दिलरुबा ♪ हो, काजव्यातली रात तू जशी सोडूनि दिवे सजली जशी रंग हा नवा माळूनी नभा तू खुणावते साजणापरी तूच भारली, दिलात कोरली लाज तुझ्या डोळ्यातली (लाज तुझ्या डोळ्यातली) तीच ऐकली, तुझ्यात बोलकी बात तुझ्या ओठातली अप्सरा तू इंद्रधनूची कस्तुरी तू माझ्या मनाची तू श्वास माझ्या जीवाचा गुंतला जीव हा, दिलरुबा साजिरी-गोजिरी दिलरुबा तू भासते चांदणी प्रेयसी तू साजिरी-गोजिरी दिलरुबा तू भासते चांदणी प्रेयसी तू