बया बया बया! काय झालं बया? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई! मोडकंच घर, तुटकंच छप्पर पन र्हायाला जागा नाही मला दादला नको ग बाई! फाटकंच लुगडं, तुटकीच चोळी पन शिवायला दोरा न्हाई मला दादला नको ग बाई! कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी वर तेलाची धारच न्हाई मला दादला नको ग बाई! एका जनार्दनी समरस झाले पण तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई!