पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
श्रावणाचा गंध ओला होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
श्रावणाचा गंध ओला होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
♪
भावनांचा पूर माझ्या...
भावनांचा पूर माझ्या होऊनी येशील का?
गायणीचा सूर माझ्या...
गायणीचा सूर माझ्या होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
श्रावणाचा गंध ओला होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
♪
स्पंदनाचा नाद माझ्या...
स्पंदनाचा नाद माझ्या होऊनी येशील का?
जीवनाचा अर्थ माझ्या...
जीवनाचा अर्थ माझ्या होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
श्रावणाचा गंध ओला होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
♪
नयनीचा तू अश्रू माझ्या...
नयनीचा तू अश्रू माझ्या होऊनी येशील का?
वेदनेचा अंत माझ्या...
वेदनेचा अंत माझ्या होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
श्रावणाचा गंध ओला होऊनी येशील का?
पहाटेचा मंद वारा होऊनी येशील का?
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist