Kishore Kumar Hits

Nandesh Umap - Mi Faslo Mhanuni lyrics

Artist: Nandesh Umap

album: Damlelya Babachi Kahani


मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन नितांत लोभस वाणी
ती वेळच होती वेडी अन नितांत लोभस वाणी
मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन नितांत लोभस वाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती अन झाड मारवा होते
मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन नितांत लोभस वाणी

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्णनयनीचे डोह
भरभरून यायचे तेव्हा त्या कृष्णनयनीचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले
मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन नितांत लोभस वाणी
ती हार असो वा जीत मज कुठले अप्रूप नाही
ती हार असो वा जीत मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लाल केशरी संध्या निघताना अडखळलेली
ती लाल केशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जाताना ही...
ती निघून जाताना ही बघ ओंजळ होती ओली
मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन नितांत लोभस वाणी

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists