Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Baalpan lyrics

Artist: Salil Kulkarni

album: Ja Dile Mann Tula


एकटी एकटी घाबरलीस ना...
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
आली होती जाम झोप गुडूप झालो असतो
भीती-बीती कसली थेट उद्याच उठलो असतो
आली होती जाम झोप गुडूप झालो असतो
भीती-बीती कसली थेट उद्याच उठलो असतो
मात्र वाटलं...
मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही
मी आहे शूर माझी आई तशी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना...
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत-बिडत बसेल
खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल
घाबरून जाईल अंधारात रडत-बिडत बसेल
म्हणून आलो...
म्हणून आलो आता काही घाबरायचं नाही
कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही
एकटी एकटी घाबरलीस ना वाटलाच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही
बरं झाला आलास सोन्या काही खोटं नाही
कुशीत नसता पिल्लू तेंव्हा घाबरतेच रे आई
विचारांनी साऱ्या कस गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोटं
विचारांनी साऱ्या कस गलबलायला होत
अंधार असतो फार मोठा पिल्लू असतं छोटं
नाजूक नाजूक त्याचा जीव नाजूक नाजूक मन
कोवळी काच सोसेल कसे भविष्याचे धन
लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल
मोठा होशील उडून जाशील तेंव्हा काही होईल
कोण असशील कुठे असशील करशील काही तेंव्हा
लहान होऊन कुशीमध्ये शिरशील काही तेंव्हा
माझा आहेस अजून ये रे माझ्या पाशी राहा
अंगाईच्या कुशीमध्ये छान स्वप्ना पहा
मोठी होतात
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही
मोठी होतात मुलं आई मोठी होत नाही
कुशीत नसता पिल्लू तेंव्हा घाबरतेच रे आई.

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists