Kishore Kumar Hits

Salil Kulkarni - Karun karun kalji majhi lyrics

Artist: Salil Kulkarni

album: Aggobai Dhaggobai, Vol.2


करून-करून काळजी माझी, करून-करून लाड
करून-करून काळजी माझी, करून-करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा, झोपा जरा गाढ

करून-करून काळजी माझी, करून-करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा, झोपा जरा गाढ

मागणार नाही उगाच खाऊ, मागणार नाही खेळ
लवकर उठेन, आवरायाला लावणार नाही वेळ
मागणार नाही उगाच खाऊ, मागणार नाही खेळ
लवकर उठेन, आवरायाला लावणार नाही वेळ
शाळेमध्ये जाईन रोज, सगळा डबा खाईन
अभ्यास करीन, TV सुद्धा थोडाच वेळ पाहीन
देवापुढे लावीन दिवा, जेवण करीन मस्त
वरण, भात, भाजी, चटणी सगळं करीन फस्त
शेपूचीही भाजी, शेपूचीही भाजी सांगेन आई दोनदा वाढ
दमलात तुम्ही आई-बाबा, झोपा जरा गाढ

वागणार नाही वाईटसाईट, राखीन तुमचं नाव
माझे आई-बाबा म्हणून ओळखेल तुम्हां गाव
वागणार नाही वाईटसाईट, राखीन तुमचं नाव
माझे आई-बाबा म्हणून ओळखेल तुम्हां गाव
लवकर-लवकर शिकीन आणि लवकर मोठा होईन
बाबासारखे ऑफिसातून पैसे घेऊन येईन
वणवण करतो बाबा, त्याचे कमी होईल काम
दमला तो ही, त्याला आता मिळू दे आराम

भाजी आणीन, आईसाठी, laundry मध्ये जाईन
दोघांनाही फिरायला गाडीमधून नेईन
आई म्हणेल, आई म्हणेल हेच का ते कार्ट माझं द्वाड
दमलात तुम्ही आई-बाबा, झोपा जरा गाढ

घट्ट मिटा डोळे, तुम्हां कुशीमध्ये घेतो
पांघरायाला माझं मऊ पांघरूण देतो
घट्ट मिटा डोळे, तुम्हां कुशीमध्ये घेतो
पांघरायाला माझं मऊ पांघरूण देतो
झालो आता मोठा, सांगा छळेल तुम्हां कोण?
आई-बाबा तुम्ही आता मुलं माझी दोन
पाहू नका असे आता, नाते झाले नवे
मात्र आता तुम्ही माझे ऐकायला हवे
का रे बाबा, मिशीमध्ये हसतोस असा?
आई बघा रडू लागे, डोळे तिचे पुसा
हात जोडे आई, हात जोडे आई, बाबा म्हणतो लबाड
दमलात तुम्ही आई-बाबा, झोपा जरा गाढ

करून करून काळजी माझी, करून करून लाड
करून करून काळजी माझी, करून करून लाड
दमलात तुम्ही आई-बाबा, झोपा जरा गाढ

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists