अनंता तुला ते कसे रे स्तवावे? अनंता तुला ते कसे रे नमावे? अनंता मुखांचा सिने शेष गाता नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे उरावे तरी भक्तीसाठी स्वभावे तरावे जगा तारुनी मायताता नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा वसे जो सदा दावया संत लीला दिसे अज्ञ लोकांपरी जो जनाला परी-अंतरी ज्ञान कैवल्यदाता नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा बरा लाभला जन्म हा मानवाचा नरासार्थका साधणी भुतसाचा धरू साई प्रेमा गळाया अहंकार नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा धरावे करी सान अल्पज्ञबाला करावे आम्हा धन्य चिंबोनी गाला मुखी घाल प्रेमे खरा घास आता नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा सुरादिक ज्यांच्या पदा वंदिताती शुकादीक ज्याते समानत्व देती प्रयागाती तीर्थे पदी नम्र होता नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली सदा रंगले चित्स्वरूपी मिळाले करी रासक्रीडा सवे कृष्णनाथा नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा तुला मागतो मागणे एक द्यावे करा जोडीतो दीन अत्यंत भावे भवी मोहनिराज हा तारी आता नमस्कार शाष्टांग श्री साईनाथा