आला खुशीत् समिंदर, त्याला नाही धिर,
होडीला देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू!
हिरवं हिरवं पांचूवाणी जळ
सफेत फेसाची वर खळबळ
माशावाणी काळजाची तळमळ
माझि होडी समिंदर ओढी खालीवर
पाण्यावर देइ ना ग ठरू
सजणे, होडीला बघतोय् धरू!
तांबडं फुटे आभाळांतरी
रक्तावाणी चमक् पाण्यावरी
तुझ्या गालावर तसं काही तरी
झाला खुळा समिंदर, नाजुक् होडीवर
लाटांचा धिंगाणा सुरू
सजणे, होडीला बघतोय् धरू!
सूर्यनारायण हसतो वरी
सोनं पिकलं दाहिदिशांतरी
आणि माझ्याहि नवख्या उरी
आला हासत समिंदर, डुलत फेसावर
होडीशी गोष्टी करू
सजणे, होडीला बघतोय् धरू!
गोर्या भाळी तुझ्या लाल् चिरी
हिरव्या साडीला लालभडक धारी
उरी कसली ग गोड शिरशिरी?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर
चाले होडी भुरुभुरू
सजणे, वार्यावर जणु पाखरू!
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist