भरून-भरून, भरून-भरून
भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून
(भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून)
भरल्या वटीनं जड-जड झालंय (भरून-भरून)
शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा
शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा
आला वास ओला मातीचा सोयरा
(भरून-भरून)
(भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून)
♪
(तुला चिंचा, बोरं देऊ काही, देऊ काही गं?)
(काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं)
(तुला चिंचा, बोरं देऊ काही, देऊ काही गं?)
(काय मनात? कानात सांगून दे तू माझ्या बाई गं)
पान पानाला सांगून जाई, कळी सुखानं भरली बाई
पान पानाला सांगून जाई, कळी सुखानं भरली बाई
गळूनी फूल आता फळ आलं मोहरा
(भरून-भरून)
(भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून)
♪
भर दिसा कशाची चाहूल आली, आली बाई गं
जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाही गं
(सयी साजणी-साजणी, सयी साजणी-साजणी)
कशी इकडचं घेऊ नावं, माझं गुपित मजला ठावं
कशी इकडचं घेऊ नावं, माझं गुपित मजला ठावं
फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा
(भरून-भरून)
(भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून)
♪
(बीज रुजून झाली लेकूरवाळी धरती बाई गं)
(तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं)
(बीज रुजून झाली लेकूरवाळी धरती बाई गं)
(तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं)
थट थाटाला झोका देई, पान सळसळ गाणं गाई
थट थाटाला झोका देई, पान सळसळ गाणं गाई
हाती काय येई, जाई की मोगरा
(भरून-भरून)
(भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून)
♪
टपटप, टपटप
(टपटप, टपटप, टपटप, टपटप)
टपटप, टपटप, टपटप, टपटप
(टपटप, टपटप, टपटप, टपटप)
टपटप, टपटप, टपटप, टपटप
♪
लप पोरी लप, घरात लप
जप पोरी जप, जीवाला जप
लप पोरी लप, घरात लप
जप पोरी जप, जीवाला जप
राहू, आत जाऊ...
राहू, आत जाऊ, कुणी बाई सावरा
(भरून-भरून)
(भरून-भरून आभाळ आलंय, भरून-भरून)
भरल्या वटीनं जड-जड झालंय (भरून-भरून)
भरून-भरून आभाळ आलंय
(भरून-भरून आभाळ आलंय)
भरून-भरून आभाळ आलंय
(भरून-भरून आभाळ आलंय)
भरून-भरून आभाळ आलंय
(भरून-भरून आभाळ आलंय)
Поcмотреть все песни артиста