Kishore Kumar Hits

Shridhar Phadke - Utha Utha Ho Saagli lyrics

Artist: Shridhar Phadke

album: Varsa Laxmicha


उठा उठा हो सक सकळीक
वाचे स्मरावा गजमुख
ऋध्दीसिध्दिंचा नायक
सुखदायक भक्तांसी
अंगी शेंदुराची उटी
माथां शोभतसे किरीटी
केशर कस्तूरी लल्लाटी
हार कंठी साजिरा
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा
गमूं पंथ आनंत या राघवाचा
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सोडू नये तो
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो
मना वासना दुष्ट कामा न ये रे
मना सर्वथा पापबुद्धी नको रे
मना धर्मता नीति सोडूं नको हो
मना अंतरीं सार वीचार राहो
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा
मना कल्पना ते नको वीषयांची
विकारे घडे हो जनी सर्व ची ची
नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
नको रे मना मत्सरु दंभ भारु
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावें
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावें
देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी
मना सज्जना हेचि क्रीया धरावी
मना चंदनाचे परी त्वां झिजावे
परी अंतरीं सज्जना नीववावे
जनीं सर्वसूखी असा कोण आहे
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले
तयासारिखे भोगणें प्राप्त जाले
मना मानसीं दु:ख आणूं नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी
समर्थाचिया सेचका वक्र पाहे
असा सर्व भुमंडळी कोण आहे
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
समस्तामधे सार साचार आहे
कळेना तरी सर्व शोधुन पाहे
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं
म्हणे दास विश्वास नामी धरावा
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
जनीं भोजनी नाम वाचे वदावें
अती आदरे गद्यघोषे म्हणावे
हरीचिंतने अन्न सेवीत जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें
मुखी नाम नाहीं तया मुक्ति कैंची
अहंतागुणे यातना ते फुकाची
पुढे अंत येईल तो दैन्यवाणा
म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा
नभासारिखे रुप या राघवाचे
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे
तया पाहता देहबुद्धी उरेना
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं
पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्
वामांकारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं
नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचंद्रम्
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन्
नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति
भोग और मोक्ष दोनोंको प्राप्त करता है
जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्
य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय:
रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम्
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथनयं श्यामलं शान्तमूर्तिम्
वन्दे लोकभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्
भगवान् रामकी मैं वंदना करता हूं
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:
श्रीराम राम रघुनन्दन राम राम
श्रीराम राम भरताग्रज राम राम
श्रीराम राम रणकर्कश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये
माता रामो मत्पिता रामचंन्द्र
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्
नान्यं जाने नैव जाने न जाने
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists