देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा, आता उघड दार देवा
उघड दार देवा, आता उघड दार देवा
♪
पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्याची?
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा?
उघड दार देवा, आता उघड दार देवा
♪
उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे-त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा
उघड दार देवा, आता उघड दार देवा
♪
स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी
घडो-घडी अपराध्यांचा तोल सावरावा
उघड दार देवा, आता उघड दार देवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा, आता उघड दार देवा
उघड दार देवा, आता उघड दार देवा
Поcмотреть все песни артиста
Other albums by the artist