Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Ata Majha Rang lyrics

Artist: Sandeep Khare

album: Ata Majha Rang


आता माझा रंग झाला जळागत
आता माझा रंग झाला जळागत
केशर काजळ ज्याचे-त्याचे
डोकावता कोणी पाहते स्वरूप
डोकावता कोणी पाहते स्वरूप
सुरूप कुरूप ज्याचे-त्याचे
आता माझा रंग झाला जळागत
केशर काजळ ज्याचे-त्याचे

वाहीन शर्करा विषाचेही धर्म
मागे उभे कर्म ज्याचे-त्याचे
वाहीन शर्करा विषाचेही धर्म
मागे उभे कर्म ज्याचे-त्याचे
होईन साजरा पळीत पेल्यात
होईन साजरा पळीत पेल्यात
पेलणारे हात ज्याचे-त्याचे
आता माझा रंग झाला जळागत
केशर काजळ ज्याचे-त्याचे

रुजे विषवल्ली, रुजेल तुळस
रुजे विषवल्ली, रुजेल तुळस
शिंपणारे हात ज्याचे-त्याचे
माझे तर आता जळागत अंग
माझे तर आता जळागत अंग
धावते निसंग सागराशी
आता माझा रंग झाला जळागत
केशर काजळ ज्याचे-त्याचे
डोकावता कोणी पाहते स्वरूप
सुरूप कुरूप ज्याचे-त्याचे
केशर काजळ ज्याचे-त्याचे
शिंपणारे हात ज्याचे-त्याचे

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists