क्षण-क्षण आता घेऊ लागले... क्षण-क्षण आता घेऊ लागले आनंदाची गिरकी फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती (क्षण-क्षण आता घेऊ लागले आनंदाची गिरकी) (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती) (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती) ♪ (अजून जरी कुणी नाही लळा लागला बाई) हुंकारत ये आतून काही जाणिवेस या नावच नाही हुंकारत ये आतून काही जाणिवेस या नावच नाही रोज-रोज मग नवे-नवेसे, हवे-हवेसे वाटे काही (रोज-रोज मग नवे-नवेसे, हवे-हवेसे वाटे काही) उधानलेला झुला पोहचतो अलगद चंद्रावरती (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती) (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती) ♪ (चंदनाचा गंध, चांदण्याचा रंग लेवूनिया सयेबाई बसली गं) (अंगणात पक्षी, पंखावर नक्षी पाहुनिया खुदकन हसली गं) ऐक माझे सयेबाई, ऐक माझे सयेबाई ऐक माझे सयेबाई माग देवापाशी काही फुल माझ्यासुद्धा दारी एक उमलू दे माझी माती भिजवू दे, माझी कूस उजवु दे चंद्र माझ्या अंगणात सुद्धा उगवू दे जेथे पाहते तिकडे... जेथे पाहते तिकडे एक गोजिरे रुपडे दिन-रात घाली मनभर पिंगा गं (पिंगा गं) जेथे पाहते तिकडे एक गोजिरे रुपडे दिन-रात घाली मनभर पिंगा गं त्याच्या एकाच हाकेत येवू अमृत उरात सांग पोटातून मांड माझ्या दंगा गं (दंगा गं, दंगा गं) पोटातून मांड माझ्या दंगा गं ऐक माझे सयेबाई, ऐक माझे सयेबाई (क्षण-क्षण आता घेऊ लागले आनंदाची गिरकी) (क्षण-क्षण आता घेऊ लागले आनंदाची गिरकी) फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती) क्षण-क्षण आता घेऊ लागले आनंदाची गिरकी (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती) (फुल नवे फुलणार आता या हिरव्या वेलीवरती)