साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन अरे, साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन काळ मोठा, वेळ खोटी जन्मच म्हणतो चेपेन-चेपेन काळ मोठा, वेळ खोटी जन्मच म्हणतो चेपेन चेपेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन ♪ जगणे साले आचके देता नाकापाशी धरतो सूत गचके खाऊन मेली स्वप्ने त्या स्वप्नांचे झाले भूत जगणे साले आचके देता नाकापाशी धरतो सूत गचके खाऊन मेली स्वप्ने त्या स्वप्नांचे झाले भूत भूत म्हणाले झाडाला अस्तित्वाच्या फांद्यांना अरे, भूत म्हणाले झाडाला अस्तित्वाच्या फांद्यांना सुटका नाही दिवस-रात्र घरात-दारात भेटेन-भेटेन सुटका नाही दिवस-रात्र घरात-दारात भेटेन-भेटेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन अरे, साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन ♪ दिवस रोजचा थापा मारत दारावरती देतो थाप दोरी-दोरी म्हणता म्हणता त्या इच्छांचे झाले साप दिवस रोजचा थापा मारत दारावरती देतो थाप अरे, दोरी-दोरी म्हणता म्हणता त्या इच्छांचे झाले साप धरता हाती डसती रे सोडून देता पळती रे अरे, धरता हाती डसती रे सोडून देता पळती रे मन म्हणते पकडीन-पकडीन हात म्हणतो सोडेन-सोडेन मन म्हणते पकडीन-पकडीन हात म्हणतो सोडेन-सोडेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन ♪ मी बुद्धाला मारून डोळा भरतो माझा पेला रे प्याला तो ही गेला जो ना प्याला तो ही गेला रे अरे, मी बुद्धाला मारून डोळा भरतो माझा पेला रे प्याला तो ही गेला जो ना प्याला तो ही गेला रे या जगण्याला फुटता घाम छलकत जातो माझा जाम अरे, या जगण्याला फुटता घाम छलकत जातो माझा जाम अर्थ म्हणतो दारू-दारू शब्द म्हणतो champagne-champagne अर्थ म्हणतो दारू-दारू शब्द म्हणतो champagne-champagne साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन अरे, साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन ♪ पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे अरे, या जगण्याचे झाले आहे पत्त्यावाचून पाकीट रे पानावरती कितीक मजकूर शब्द नव्हे ती किटकिट रे या जगण्याचे झाले आहे पत्त्यावाचून पाकीट रे हसलो मी जरी रडलो मी इथे येउनी पडलो मी अरे, हसलो मी जरी रडलो मी इथे येउनी पडलो मी जन्म बोंबले सांगा-सांगा मृत्यू म्हणतो सांगेन-सांगेन जन्म बोंबले सांगा-सांगा मृत्यू म्हणतो सांगेन-सांगेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन अरे, साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन काळ मोठा, वेळ खोटी जन्मच म्हणतो चेपेन-चेपेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन अरे, साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन-चेपेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन साहेब म्हणतो चेपेन-चेपेन पोलिस म्हणतो चेपेन