Kishore Kumar Hits

Sandeep Khare - Sariwar Sar lyrics

Artist: Sandeep Khare

album: Diwas Ase Ki


दूरदूर नभपार, डोंगराच्या माथ्यावर
दूरदूर नभपार, डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल, उतू गेले मनभर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून वीजवेडी मेघधून
ओल्या ओल्या मातीतून वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल, गेले जल, झाले जल आरपार
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर (सर, सर, सर)
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर
सरीवर सर

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists