Kishore Kumar Hits

Krishna Shinde - Aata Tari Panduranga Ghado Tuzhi Bhet lyrics

Artist: Krishna Shinde

album: Ushirane Disali Pandharichi Wat


कितीतरी जीवनी माझ्या झाले मला कष्ट
कितीतरी जीवनी माझ्या झाले मला कष्ट
आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)

पाहण्यास रूप तुझे ते गोजिरे-सावळे
आतुरही झाले किती हे, देवा माझे डोळे
माझ्या पावलाने धरावी पंढरीची वाट
आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)

तुझ्यामुळे झाली देवा पावन ही धरणी
तसे चंद्रभागेचे ते शुद्ध होई पाणी
धन्य-धन्य झाली जगती पुंडलिकाची वीट
आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)

तुझ्याविना नाही माझ्या जीवनाला अर्थ
होईल हे जीवन माझे दर्शनाने सार्थ
भक्ती सागराचा मार्ग दावी मला नीट
आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)

मजला घडावी आता पंढरीची वारी
पाहीन मी डोळे भरुनी मृथु सावळा हरी
मिळण्यास मुक्ती अनंता भक्ती कर आलोट
आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
कितीतरी जीवनी माझ्या झाले मला कष्ट
कितीतरी जीवनी माझ्या झाले मला कष्ट
आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)
(आता तरी पांडुरंगा घडो तुझी भेट)

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists