बोलुनी अबोल ही रानपाखरांची धुंद वाणी आज ही वाटे नवी काही कळे ना, जीव रुळे ना (जीव रुळे ना) नवीन पहाट गुलाबी, हवेत होता गारवा दिसे दूर क्षितिजावर बेधुंद पाखरांचा थवा या कोवळ्या उन्हाने पिंजरा रंग हा सावळ्या नभाची उजळे अभा सागरा तळाशी विरुनी चंद्रिक स्वर्गी झेप घेई दिशा नव्या ♪ मुग्ध मनाचे हे रंग ल्याले काय सांगू कशी मी कुणाला? आठवणीच्या कोशामध्ये जुळून येती जुन्या बंध रेषा सांधुनी नव्या करूण आशा बोलुनी अबोल ही रानपाखरांची धुंद वाणी आज ही वाटे नवी काही कळे ना, जीव रुळे ना