जरा अंथरू चांदण्याला लपेटून घेऊ धुक्याला वाटे मला काळ थांबला भास हा हवा-हवा भास हा नवा-नवा भास हा... जरा अंथरू चांदण्याला लपेटून घेऊ धुक्याला वाटे मला काळ थांबला भास हा हवा-हवा भास हा नवा-नवा भास हा... ♪ अलवार या नभाला जरा वाटे मिठीत घ्यावे फसवुनी या वाऱ्यास अन् नदीच्या तळाशी लपावे अलवार या नभाला जरा वाटे मिठीत घ्यावे फसवुनी या वाऱ्यास अन् नदीच्या तळाशी लपावे मनाशी पुन्हा पैज लावू जगपासुनी दूर जाऊ दोघेच जेथे असू सखे भास हा हवा-हवा भास हा नवा-नवा भास हा... ♪ झुळकेपरी बटांना तुझ्या हलकेच मी सावरावे नाजुकशा ओठास ही उषेचे नवे रंग द्यावे झुळकेपरी बटांना तुझ्या हलकेच मी सावरावे नाजुकशा ओठास ही उषेचे नवे रंग द्यावे जणू लाट मी, तू किनारा जणू काठ झाला निवारा श्वासात रे श्वास गुंतला भास हा हवा-हवा भास हा नवा-नवा भास हा... जरा अंथरू चांदण्याला लपेटून घेऊ धुक्याला वाटे मला काळ थांबला भास हा हवा-हवा भास हा नवा-नवा भास हा...