तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले किती करिशी मजला व्याकुळ? प्राण कंठी दाटले तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले ♪ काहूर आठवणींचे क्षणाक्षणाला छळते व्यथा मनाची माझ्या तशी न तुजला कळते विसरलास का शपथा? की ते भास जहाले तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले किती करिशी मजला व्याकुळ? प्राण कंठी दाटले तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले ♪ ध्यास तुझाच जीवाला, माझे मीपण सरले आता अवघे जगणे तुझ्याचसाठी उरले रिते तुझ्याविन सारे नभ झाकोळून आले तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले किती करिसी मजला व्याकुळ? प्राण कंठी दाटले तुला शोधता-शोधता कासावीस मन झाले