Kishore Kumar Hits

Ashok Patki - Dhag Datuni Yetat lyrics

Artist: Ashok Patki

album: Aaishpath


ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात
ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी १६ थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात

माती लेऊनिया गंध होत जाते धुंद-धुंद
माती लेऊनीया गंध होत जाते धुंद-धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध, बंध, बंध
मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात
मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात
ऋतु पावसाळी १६ थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात

(सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया)
(सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया)
(झिलरी-झिलरी आम्ही-तुम्ही सुंबरान गाऊया)
(सुंबरान गाऊया रं, सुंबरान गाऊया)

जीव होतो ओला चिंब...
जीव होतो ओला चिंब घेतो पाखराचे पंख
...घेतो पाखराचे पंख
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग, रंग, रंग
शब्द भिजूनी जातात, अर्थ थेंबांना येतात
शब्द भिजूनी जातात, अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी १६ थेंब होऊनी गातात
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
(झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची)
सर येते माझ्यात

Поcмотреть все песни артиста

Other albums by the artist

Similar artists